Uncategorized

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी कार्यक्रमाचा उद्घघाटन सोहळा संपन्न

लखलखता तेजस्वी सूर्य 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि भारतीय जनतेने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मोकळा श्वास घेतला ज्यांच्या सत्तेवर सूर्य मावळत नाही असे म्हटले जात होते त्यांना आमच्या देशातील स्वातंत्र्यवीरांनी हाकलून लावले परंतु हे स्वातंत्र्य भारताला सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी कितीतरी भारतीय महापुत्रांनी अंगावर गोळ्या झेलल्या तर कितीतरी वीरांनी हसत खेळत स्वतःला फास लावून घेतले तर काही क्रांतिकारकांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी बहाल केले अशा क्रांतिकारकांच्या विचारांचा उजाळा देणे,त्यांचे विचार पुन्हा समाजात मांडता यावे यासाठी भुसावळ येथील कला ,विज्ञान आणि पी .ओ .नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखेच्या वतीने स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली जाणार असून वर्षभर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले जाणार असून व्याख्याने,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीत ,पथनाट्य यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली जाणार आहे याचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या वाचन कक्षात ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळचे अध्यक्ष मा. डॉ. मोहन भाऊ फालक यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत कोषाध्यक्ष मा. संजयजी नाहाटा ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ. एस .व्ही .पाटील, डॉ. बी. एच. बऱ्हाटे, डॉ. ए .डी .गोस्वामी ,डॉ. एन. ई .भंगाळे, तसेच मानव्य विद्याशाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. आज भारतात स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी केली जात आहे.आपल्या महाविद्यालयात या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्याचा उत्तर काळ समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जाणार आहे आपण साऱ्यांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा ,स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करावी असे आवाहन मा. डॉ.मोहन भाऊ फालक यांनी यावेळी केले
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उद्घाटन सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मोहन भाऊ फालक समवेत कोषाध्यक्ष माननीय संजय जी नाहाटा प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे व उपप्राचार्य


स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उद्घाटन सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मोहन भाऊ फालक समवेत कोषाध्यक्ष माननीय संजय जी नाहाटा प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी वायकोळे व उपप्राचार्य. _________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 97647515

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0