News

भुसावळ भाजपाने मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याचा केला आनंदोत्सव साजरा..

भुसावळ (प्रतिनिधी)गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिरे, गुरुद्वारा, मशिदी,बौद्ध विहार हे धार्मिक स्थळे महाविकास आघाडी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सात महिन्यांपासून बंद होते.यासाठी भारतीय जनता पार्टी ने वेळोवेळी आवाज उठवून घंटा ना सारखे आंदोलने करून धार्मिक स्थळे लवकरात लवकर उघडण्यासाठी प्रयत्न केले.शेवटी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली.धार्मिक स्थळे उघडल्याचा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे करण्यात आला.यावेळी भुसावळ शहरातील अष्टभुजामाता मंदिर येथे झांज व ढोलकी वाजवून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते द्वारपुजन करून आरती करण्यात आली व अष्टभुजा मातेचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व भाविकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर चे शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे,माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस राजेंद्र चौधरी, शैलेजाताई पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, महिला आघाडी शहराध्यक्ष अनिता ताई आंबेकर, अजय नागराणी, प्रशांत देवकर, प्रा.विलास अवचार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, पुंडलिक पाटील धनराज बाविस्कर,राहुल तायडे, जयंत माहुरकर,संजय बोचरे,प्रसन्न पांडे,महिला मोर्चाच्या दिप्ती चौधरी, पल्लवी पाटील, मंगला वाणी, युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रेयस इंगळे,नंदकिशोर बडगुजर,विजय डोंगरे, सागर जाधव आदी कार्यकर्ते व भाविकांची उपस्थिती होती._________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 97647515

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Shares