News

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे गांधी जयंती निमित्त नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून सन्मान

भुसावळ(प्रतिनिधी)माननीय संपादकदिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे महात्मा गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा “स्वच्छता दूत” म्हणून गौरव करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असतांना सुद्धा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.त्याच प्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवित असलेल्या स्वछ भारत अभियानात सफाई कर्मचाऱ्यांनी अभियान यशस्वी होण्यासाठी मोलाची कामगिरी बजावल्या बद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे भुसावल तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नगरपालिकेच्या 137 सफाई कर्मचाऱ्यांना “स्वच्छता दूत” संबोधून त्यांचा श्रीफळ, रुमाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी,आरोग्य सभापती प्रा दिनेश राठी,समाज सेवक संतोष बारसे,जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे,जिल्हा चिटणीस सौ शैलेजाताई पाटील, महिला आघाडी अध्यक्ष सौ अनिताताई आंबेकर,ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजु खरारे,अरुणकाका भावसार,लक्ष्मण सोयंके,राजेंद्र आवटे,अजय नागराणी,गिरीश महाजन, सतिश सपकाळे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन,खुशाल जोशी, विशाल जंगले,पवन बुंदेले,सुरेश शर्मा, गिरीश पाटील, प्रा.विलास अवचार, दिलीप कोळी, धनराज बाविस्कर, अनुसुचित जातीचे शहराध्यक्ष राहुल तायडे,स्वच्छ भारत अभियानाचे शहराध्यक्ष प्रसन्न पांडे,शंकर शेळके, ऍड.अभिजित मेने,प्रविण इखणकर,ऍड. योगेश बाविस्कर, दिपक तायडे,गौतम जोहरे,नितीन पाटील, संजय बोचरे, वेद प्रकाश ओझा,चेतन बोरोले, महिला मोर्चाच्या सौ दिप्ती पाटील,सौ पल्लवी चौधरी,युवा मोर्चा सरचिटणीस श्रेयस इंगळे,नंदकिशोर बडगुजर,विनित हंबर्डीकर,लखन रणधीर,गोपीसिह राजपुत, चेतन सावकारे,प्रसिद्धी प्रमुख प्रशांत भट,सागर जाधव,मयुर सावकारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास नगरपालिकेचे महिला व पुरुष सफाई कर्मचारी तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते._________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 9764751552

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0