News

नाहाटा महाविद्यालयातर्फे स्वच्छतागृहाचे लोकार्पण

भुसावळ(प्रातिनिधी)भुसावळ येथील भुसवळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यलयातील अर्थशास्त्र विभाग व नियोजन अभ्यास मंडळ यांच्यावतीने दरवर्षी 2 ऑक्टो. म. गांधी जयंतीनमित्त महादेव माळ येथे खेड्याकडे चला हे अभियान राबवण्यात येते. या अभियानाअंतर्गत महादेव माळ हे गांव दत्तक घेतलेले असून येथे दरवर्षी 2 ऑक्टो. ला म.गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येते. त्याअंतर्गत ग्रामस्वचछता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन याबाबत जनजागरण करण्यात येते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आज दि. 2 ऑक्टो. रोजी महादेव माळ येथे महाविद्यालयातर्फे बांधलेल्या स्वच्छता गृहाचा लोकार्पण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ सौ. एम.व्ही.वायकोळे आणि कु-हे पानाचे ग्रा.पं. सरपंच मा. श्री. जीवनभाऊ पाटील तसेच जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील, डाॅ. बी.एच.ब-हाटे, डाॅ.ए.डी.गोस्वामी, डाॅ. एन.ई.भंगाळे यांचेसमवेत ताराचंद बापू नाईक (ज्येष्ठ नागरीक, महादेव माळ),श्री.लक्ष्मण जाधव(ग्रा.पं. सदस्य), श्री.परशरामभाऊ जाधव(वनसमिती अध्यक्ष), श्री.सुभाषभाऊ जाधव(अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), श्री.अजय राठोड, श्री. विलास रंदाळे (उपसरपंच), श्री.गौतमदादा मेघे(ग्रा.पं. सदस्य), श्री. किशोर पाटील(ग्रा.पं. सदस्य), श्री. संदीप महाजन (ग्रा.पं. सदस्य), श्री.प्रकाश जाधव, श्री. निलेश पाटील (उपशिक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला.त्यानंतर राष्ट्रपिता म.गांधी व माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतागृहांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांसमवेत चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डाॅ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, रा.से.यो. चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.आर.एस.नाडेकर,डाॅ.सौ. ममताबेन पाटील आदींनी परीश्रम घेतले._________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 9764751552

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0