Local NewsNews

दैनिक वृत्तपत्राच्या संपादकास जीवेठार मारण्याची धमकी , दोन भावांवर गुन्हा दाखलं


जामनेर (प्रतिनिधी)आमच्या गणेशवाडीतून का येजा करतो असे म्हणत मोबाईल वरून अश्लील शीवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पवन विश्वनाथ माळी व विनायक विश्वनाथ माळी रा गणेश वाडी जामनेर यांच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा जामनेर पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आला आहे .दैनिक जळगाव प्रहारचे संपादक मच्छिंद्र सदाशिव इंगळे हे दर शनिवारी शनी मंदीरात दर्शना साठी जातात तसेच पत्रकार असल्यामुळे बातमी संकलनासाठी व खाजगी कामा साठी गणेश वाडी मार्गे फिरावे लागत असते .पवन माळी व विनायक माळी या दोघांना हे खटकत होते .त्यामुळे मच्छिंद्र इंगळे यांच्या वर आमच्या वाडीतून का येजा करतोस ? असे विचारून अश्लील शिवीगाळ करून बिनबुडाचे आरोप केले तसेच जीवेठार मारण्याची धमकी ही दिली .या संदर्भात मच्छिंद्र इंगळे यांनी जामनेर पोस्टे ला पवन माळी व विनायक माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
यातील पवन माळी याच्या विरोधात आधीही विविध गुन्हे दाखल आहेत .त्यामुळे अशा अपप्रवृतीच्या व्यक्ती विरोधात योग्य ती कारवाई व्हावी अशा अपेक्षा व्यक्त होत आहे .काही दिवसांपुर्वीच शिवसेना पक्षातील अंतर्गत वादातुन पवन माळी यास मारहाण झाल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता हे विशेष .
खोटे साक्षीदार उभे करून प्लॉट विक्री संदर्भातही पवन माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल असुन तो सध्या जामीनावर बाहेर आहे .

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0