News

अंत्योदय चे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ(प्रतिनिधी)आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे एकात्ममानव वाद तथा अंत्योदय चे प्रणेते ,उत्कृष्ट संघटक, प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले.कार्यक्रमास माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी,ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर,प्रा. दिनेश राठी, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणकाका भावसार, पंडितराव सुरवाडे, जयंतीलाल सुराणा, लक्ष्मण सोयंके, राजु खरारे, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, खुशाल जोशी, शहर सरचिटणीस रामशंकर दुबे, संदीप सुरवाडे, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, जिल्हा चिटणीस शैलजा ताई पाटील,रजनी सावकारे, महिला आघाडी शहराध्यक्षा अनिता आंबेकर,वैद्यकीय आघाडीचे डॉ सनी जैन, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अर्जुन खरारे, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष धनराज बाविस्कर ,अनुसूचित जाती शहराध्यक्ष राहुल तायडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, पवन बुंदेले, नरेंद्र बऱ्हाटे, जयंत माहुरकर, प्रवीण इखनकर,शिशिर जावळे, गौरव आवटे, युवा मोर्चा सरचिटणीस नंदकिशोर बडगुजर,दिनेश दोधानी, गोपीसिंह राजपुत आदींची उपस्थिती होती._________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 9764751552

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0