Local NewsNewsUncategorized

भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या यशस्वी कामगिरीने दुचाकीचोर गजाआड….

भुसावळ – २१ ऑक्टोम्बर रोजी रमजान शेख यांची मुलगी ऍक्टिवा ही दुचाकी घेऊन कामानिमित्ताने दुपारी २ वाजेच्या सुमारास आई हॉस्पिटल , भुसावळ ह्या आवारात ती गेली असतांना तेथे तिने दुचाकी लावली असतांना अवघ्या काही क्षणातच ती दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली ह्या संदर्भात २४ तारखेला मुलीच्या वडिलांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री सोमनाथ वाघचोरे व मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत यांनी ह्या प्रकरणाची ताबडतोब दखल घेत ३० ऑक्टोबर रोजी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर कलम ३७९ ,३४ कारवाईचे आदेश देण्यात आले यात संशयित आरोपी भिकन देवा कानोडे वय-२१ व जयेश दीपक जराड , वय-२० (भारत नगर भुसावळ) यांत एक अल्पवयीन संशयित देखील आहे यांना भारत नगर येथून ताब्यात घेण्यात आले होते सदर प्रकरणातील आरोपींच्या हातून सदर दुचाकी ३१ रोजी ताब्यात घेण्यात आली यात चोरट्यांच्या हातून ऍक्टिवा , हेरॉहोंडा ह्या दोन दुचाकींना शोधण्यात पोलिसांना यश आलेले आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री.डॉ. प्रविण मुंडे सो.,जळगाव व मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी सो,तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सोमनाथ वाघचौरे सो भुसावळ भाग भुसावळ व मा.पोलीस निरीक्षक श्री.दिलीप भागवत सो यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी. श्री. अनिल मोरे,श्री मंगेश गोटला,स.फौ. तस्लिम पठाण, पो.हे.का. इरफान काझी,अयाज सैय्यद,पो.ना.रवींद्र बिऱ्हाडे,किशोर महाजन, रमण सुरळकर, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, पो.का.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी ,कृष्णा देशमुख,चेतन ढाकणे, योगेश महाजन,सुभाष साबळे, सचिन चौधरी अशानी केली आहे. ह्या कारवाई मुळे भुसावळ पोलीस प्रशासन नागरिकांसाठी किती तत्पर आहे याचे योग्य उदाहरण आपणास बघावयास मिळते.

आरोपी कडून हस्तगत केलेल्या दुचाकी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Shares