Local NewsNewsUncategorized

जामनेर येथील तरुणी चा उपचारा दरम्यान मृत्यु..नातेवाईकांचा संताप अनावर…

उपचारा दरम्यान मृत पावलेली कु.दिपाली अर्जुन चौधरी
मयत मुलीचे नातेवाईक

जामनेर ( प्रतिनिधी) – येथील प्रसिद्ध साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेल्या २२ वर्षीय तरुणीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना तिचा सिल्लोड च्या आसपास रस्त्यातच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पाचोरा रोड वरील साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठी तोडफोड केली दरम्यान, हॉस्पिटलचे डॉ. सुरेश नाईक ,डॉ राजेश नाईक व कर्मचारी हे सकाळपासून बेपत्ता झाले आहेत.
मूळचे पहुर येथील राहिवाशी व सहा वर्षापासून अर्जुन चौधरी हे भाजीपाला लिलाव (अडत्या)हा व्यवसाय करीत असून जामनेर शहरातील प्रकाश नगर येथे राहतात त्यांना दोन मुली व एक मुलगा असून मोठी मुलगी दिपाली अर्जुन चौधरी (वय २२) हि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमाला शिकत होती.तिचा शेवटचा पेपर बाकी आहे तिला मानेच्या गाठीची समस्या असल्याने साई मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात ५ नोव्हेबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्या नंतर गाठीची तपासणीसाठी रिपोर्ट जळगाव हुन काढला त्यात निल आल्याने साधी चरबीची गाठ असल्याने दुपारी त्याच दिवशी ४ वाजता मानेच्या गाठीवर चरबी असल्याच सांगून तिचे ऑपरेशन साई हॉस्पिटलला झाले. त्यानंतर त्या नंतर सुटी करण्यात आल्याने मुलीस घरी घेऊन गेले परंतु घरी गेल्यानंतरही मुलीला उलटी व संडाशीचा त्रास वाढल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दुसऱ्या दिवशी डॉ नाईक यांनी मुलीस पुढील उपचारासाठी संध्याकाळी ७ वाजता ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल येथे दाखल केले. रविवारी ८ नोव्हेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला सकाळी ९ वाजता औरंगाबाद येथील हेडगेवार हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असतानाच सिल्लोडजवळ आल्यावर दिपालीची प्राणज्योत मावळली. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी जामनेरात मृतदेह परत आणला. साई हॉस्पिटलला मृतदेह नेत डॉ. नाईक यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र डॉ. नाईक हे सकाळपासून दवाखान्यात आलेच नाहीत हे कळल्यावर संताप आणखीच अनावर झाला. नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या खिडक्या, दरवाजे, स्वागत कक्ष व इतर भागांची मोठी तोडफोड केली. यावेळी नातेवाईकांनी रास्तारोखो करण्याचा प्रयत्न केला संतप्त नातेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालं मात्र परिस्थिती वेगळीच होती महिलांनीही संताप व्यक्त करीत डॉक्टरला समोर आणण्याच्या मागणीवर ठाम होत्या निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे ,पहुर पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे घटनास्थळी परिस्थिती वर नियंत्रण ठेवून होते घटनेची माहिती पोलीस घेत असून याबाबत डॉ. नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही दिपाली हि सुरेशदादा जैन फार्मसी कॉलेज, जामनेर येथे पदवीच्या अभ्यासक्रमाला शिकत होती. तिच्या पश्चात १ भाऊ आहे रात्री उशिरापर्यंत मयत दिपलीचा मृतदेह साई हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आला असून नातेवाईकांची गर्दी घटनास्थळी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Shares