News

जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर करा- किसान युवा क्रांती संघटना

जामनेर (प्रतिनिधी) ईश्वर चौधरी दि.०२ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व वादळामुळे शेतकन्यांचे अतोनात नुकसान झाले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार अरूण शेवाळे यांना तहसिल कार्यालय जामनेर येथे आज किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, गेल्या महिन्याभरापासून जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतात पाऊसाचे पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले पिक हिरावून गेले आहे. यामध्ये प्रामुख्याने केळी, सोयाबीन, कापुस, तुर, उडीद व फळबागा इत्यादी पिकांचे अतोनात हानी झाली असून त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जामनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट प्रति हेक्टरी ५०,०००/- रूपये लाभ मिळण्यात यावा. व ओला दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी संघटनेच्या वतीने तहसिलदार जामनेर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रामकृष्ण गोरे, अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष गजानन रमेश तायडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष योगेश पाटील सर, पोलीस मित्र संघटना जळगाव जिल्हा संघटक अश्विन रोकडे, गोपाल जाधव, विठ्ठल शेळके, नितीन इंगळे, शेतकरी राजु पाटील मालदाभाडी यांचेसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.._________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 9764751552

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0