News

आर टी स्पोर्ट्स व्दारा आयोजित क्रिकेट स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालय क्रिकेट क्लब फैजपूर संघ विजेता.

फैजपूर (प्रतिनिधी) आर टीम स्पोर्ट्स व्दारा लेदर बॉल 20-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वराज्य रेडियन्स ॲकडमी संघावर धनाजी नाना महाविद्यालय क्रिकेट क्लब फैजपूर संघाने चुरशीच्या लढतीत विजय मिळवत विजेतेपद प्राप्त केले .एम के स्पोर्ट्स ग्राउंड येथे झालेल्या
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत स्वराज्य रेडियन्स संघाने 171धावा केल्या त्यात खालिद झमान याने अर्धशतक झळकावले त्याला दिलीप विश्वकर्मा याने सुंदर साथ दिली, प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या फैजपूर संघाने चार गडी गमावून 172 धावा करून विजेतेपद मिळविले धनाजी नाना महाविद्यालय क्रिकेट क्लब फैजपूर संघाकडून फलंदाजीत सिद्धेश गावंडे व कर्णधार वकार शेख यांनी अर्धशतक झळकावले आणि चुरशीच्या लढतीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामनाविराचा बहुमान वकार शेख याला मिळाला व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आनंद जगताप आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून दिपक जगताप तसेच मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार वकार शेख या खेळाडूंना मिळाला. धनाजी नाना महाविद्यालय क्रिकेट क्लब संघाकडून धनंजय शिरीषदादा चौधरी, प्रा. शिवाजी मगर, प्रशांत ढोले, सिध्देश गावंडे,वकार शेख, ऋतवीक, अक्षय, तन्जील खान, दिपक जगताप, अनिकेत मोरे, मोहन खान, लोकेश देशमुख, आनंद जगताप, मनिष बोरसे, अर्जुन थापा, आरशद पिंजारी, सौरभ, गौरव या सर्व खेळाडूने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व रावेर-यावल क्षेत्राचे आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर, सर्व उपप्राचार्य, जिमखाना समिती चेअरमन डॉ सतिश चौधरी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ गोविंद मारतळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग सर्वांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या._______बातमी व जाहिरात साठी संपर्क साधावे मोबाईल क्रमांक…..9764751552

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Shares